हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील दुसर्या अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी वीज क्षेत्रासंबंधी घोषणा करताना म्हणाल्या कि, येत्या तीन वर्षांत देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.तसेच यापुढे वीज ग्राहकांना त्यांची कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. यासाठी २२,००० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
अर्थमंत्री आपल्या बजेट भाषणात पुढे म्हणाल्या- ‘येत्या तीन वर्षांत प्रत्येकासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर, वीज ग्राहकांना वितरण कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी २२,००० कोटी रुपये देण्यात आले आहेत.’ सरकारने ही योजना लागू केल्यानंतर एकीकडे जुन्या प्रणालीचे मीटर बदलल्यास दुसरीकडे वीज चोरीही थांबेल.