जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांचे प्रस्ताव तयार करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील तसेच पाटण तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेले अनेक रस्ते अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मंजुरीकडे अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सातारा येथील विश्रामगृहात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सातारा जिल्ह्यातील जे रस्ते वन विभागाच्या हद्दीतून जात आहेत. त्या रस्त्यांचे प्रस्ताव तयार करुन मान्यतेसाठी पाठवावेत, अशा सूचना केल्या.

सोमवारी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सातारा येथील शासकीय विश्राम गृहात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तसेच वनविभागाकडे असलेल्या रस्त्यांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. सातारा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेलो मंत्री देसाई म्हणाले, जे रस्ते वन विभागाच्या हद्दीतून जात आहेत. त्याची लवकरात लवकर माहिती घ्यावी. त्या रस्त्यांचे प्रस्ताव तयार करावेत. त्यानंतर ते प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी ऊरुल लघु पाटबंधारे कामाचाही आढावा घेतला. तसेच या प्रकल्पाचे काम सुरु करण्याबाबत विविध सूचनाही केल्या.

Leave a Comment