औरंगाबादेत संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी : बालकांसाठी 919 बेडची व्यवस्था

Bed Hospital
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना धोका असल्याची संभावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरात एक कोविड केअर सेंटर, 9 डीसी एचएससी आणि 10 डी सी एच मध्ये 919 एकोणावीस बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांनी सांगितले .

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेसाठी डॉक्टर्स, नर्स सज्ज झाले आहेत. त्यासाठी घाटी रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासोबतच प्रसुतीगृहात महिलांसह नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी दोन एमबीबीएस 4 स्टाफ नर्स 16जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेबद्दल डॉक्टर जोगदंड यांनी सांगितले गरवारे कंपनी तर्फे 125 बेडचे बाल सेंटर सुरू केले जात आहे .हे काम पूर्ण होत आहे. त्यात एक ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांवर उपचार केले जाणार आहे. बारा ते अठरा वयोगटातील बालकांसाठी एमजीएम लोकांच्या स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये मध्ये 100 बेडचे कोविड सेंटर सुरू केले जात आहे.

महापालिकेच्या मेल्ट्राॅन कोविड सेंटर मध्ये पन्नास बेड अशी एकूण 275 बेडीची तयारी करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या एन-8 येथील आरोग्य केंद्रात कोविड ग्रस्त गरोदर महिलांसाठी 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बालकांसाठी एक सीसीसी, 9 डीसीएचसी आणि 10 डिसीएचमध्ये 919 बेड असतील .