नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत थाटात पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, ‘राम मंदिर उभारणीच्या सर्वांना शुभेच्छा… प्रभू राम यांच्या मंदिर उभारणीचं कार्य सर्व प्रकारच्या न्यायप्रक्रिया, सार्वजनिक आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने होत असल्याचं ते म्हणाले.शिवाय राम मंदिर रामराज्यावर आधारलेल्या आधुनिक भारताचं प्रतिक असेल, असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला.
दरम्यान, या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्यानगरी सज्ज होती. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये अनेक नेतेमंडळी संतमहंत याठिकाणी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”