माझी व कुटुंबियांची ED मार्फत चौकशी करा; शिवसेनेच्या ‘या’ महिला आमदाराचे थेट राष्ट्रपतींनाच पत्र

Shiv Sena Ramnath Kovind

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुसते ईडीच्या या केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव जरी घेतले तरी अनेकांना घाम फुटतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून ईडीने आपल्या कारवाईतून भल्या भल्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ईडीच्या धाडीमुळे काही नेत्यांची झोपही उडाली असताना आता शिवसेनेच्या एका आमदाराने थेट राष्ट्र्पतींनाच पत्र लिहून आपली व आपल्या कुटूंबियांची तसेच व्यवसायाची चौकशी करावी, अशी … Read more

शक्ती कायद्यावर अखेर राष्ट्रपतींची सही; विधानसभेत दिलीप वळसे-पाटलांची माहिती

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अत्याचाराच्या घटनांमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने यावर निर्बध घालण्यात यावे म्हणून राज्य सरकारच्यावतीने शक्ती कायदा मंजूर करण्यात आला. या शक्ती कायद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली असल्याची माहिती आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. या कायद्यामुळे स्त्रियांना अधिकाधिक संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा … Read more

“आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर साधला. “विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो,”असा टोला ठाकरे यांनी लगावला. मुंबईत पार पडलेल्या दरबार हॉलच्या उद्धघाटन कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद … Read more

Budget Session : राष्ट्रपती म्हणाले,”आर्थिक मदतीमुळे भारताची महिला मजबूत झाल्या तर 2 कोटी गरिबांना घरे मिळाली”

नवी दिल्ली । राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करताना संसदेत सांगितले की, सरकारने महामारीच्या दबावातही देशातील महिलांना बळ देण्याचे काम केले. थेट आर्थिक मदतीबरोबरच सामाजिक स्तरावरही बदल घडवून आणणारे अनेक निर्णय घेतले. याशिवाय देशातील 2 कोटींहून जास्त लोकांना घरे देण्यात आली. राष्ट्रपती म्हणाले,”जन धन योजनेंतर्गत करोडो खाती उघडण्याचा उद्देश महिलांना आर्थिक … Read more

Budget 2022 : सबका साथ सबका विकास या तत्त्वावर केंद्र सरकारचे काम सुरु – रामनाथ कोविंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाला सुरुवात आहे. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर सरकारचे काम सुरु आहे. कोरोनानं संपूर्ण जगभरात प्रभाव टाकला. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण गमावलं. अशा कठीण प्रसंगी संसर्गाच्या काळात आपण टीम म्हणून काम … Read more

पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाब दौऱ्यातील घटनेवरून केली ‘ही’ चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या प्रकारावर त्यांनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून कालच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ … Read more

रायगडावर येण्याची संधी मिळणं आणि छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होणं ही अभिमानाची बाब- राष्ट्रपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढं नतमस्तक होणं ही प्रत्येक भारतीयांसाठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे. रायगडावर येण्याची संधी मिळणं हे माझं सौभाग्य समजतो, अशा शब्दांत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्यावर भेट दिली. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग … Read more

राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्याबाबत संभाजीराजेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दि. 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर येणार आहेत. मात्र, रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमींनी विरोध केला आहे. शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती कोविंद कसे येणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करीत महत्वाची माहिती दिली … Read more

राष्ट्रपतीचा दाैरा : रायगडावर हेलिकाॅप्टर उतरविण्यास शिवभक्तांचा विरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले रायगड येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा असून भारताचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचा शिवभक्तांना आदर आहे. किल्ले रायगड येथे हेलिकॉप्टर उतरवल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर धूळ उडत असल्यानं मूर्तीची विटंबना केल्यासारखा प्रकार घडला जाणार आहे. तेव्हा हेलिकाॅप्टर रायगडावर उतरविण्यास विरोध असल्याचे धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी … Read more

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘रायगड’ला भेट देणार; छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणार आहेत. भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय. संभाजीराजे म्हणाले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले … Read more