हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकदा बॉलिवूड क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींकडून काही अशा गाण्यांवर नृत्य केले जाते कि ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्याची मागणी होते. खासकरून ती जर धार्मिकतेशी निगतीत असतील तर. असेच एका गाण्यावरून अभिनेत्री सनी लिओनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र हि चर्चा कौतुकास्पद नव्हे तर घृणास्पद भावनेने केली जात आहे. गायिका कनिका कपूरने गायलेले आणि सनीवर चित्रित झालेले ‘मधुबन’ हे गाणे या चर्चेचे कारण आहे. या चर्चेचे रूपांतर आता वादाचे वळण घेऊ लागले आहे. मधुबन या गाण्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप करीत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी मथुरेतील पुजाऱ्यांनी केली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, 22 डिसेंबर 2021 रोजी अभिनेत्री सनी लिओनीचे मधुबन हे गाणे प्रदर्शित झाले. यानंतर वादाला तोंड फुटले आणि अखेर मथुरेतील पुजाऱ्यांनी आपला विरोध दर्शवित गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली. विशेष म्हणजे सनीच्या या गाण्यावर बंदी आणली नाही तर आपण न्यायालयात जाऊ, असा इशाराच पुजाऱ्यांनी दिला आहे. सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ गाण्याला विरोध दर्शविण्याचे कारण सांगताना मथुरेतील पुजाऱ्यांनी म्हटले कि, या गाण्यात सनी लिओनीने अश्लील नृत्य केले आहे. यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
या गाण्यामुळे अभिनेत्री सनी लिओनीवर देखील कारवाई करा, अशी मागणी वृदांवनमधील संत नवलगिरी महाराज यांनी त्यांच्या सरकारकडे केली आहे. शिवाय गाण्यावर सरकारने बंदी घालावी आणि असे न केल्यास आपण न्यायालयात जाऊ अशी आक्रमक भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सनीने गाण्यातील अश्लील दृश्य काढून टाकून माफी मागावी, अन्यथा तिला भारतात राहू देणार नाही, असा इशाराही नवलगिरी महाराजांनी दिला आहे.