पाटण | प्राथमिक शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सदर घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंब्रूळे येथे कार्यरत असलेले शिक्षक विश्वनाथ लक्ष्मण लाड (वय- ४५) यांनी आपल्या पाटण (रामापूर) येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून आपण ही आत्महत्या आजाराला कंटाळून करीत असल्याची माहिती आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोट आढळली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मूळचे गुंजाळी (ता. पाटण) येथील रहिवाशी असलेले विश्वनाथ लाड हे बुधवारी (दि १०) सकाळी आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी मेंढोशी येथे आपल्या पत्नीसह गेले होते. मात्र पत्नीला लग्नात सोडून ते एकटेच घरी पाटणला परतले. घरी येऊन घरातील पंख्याला ओढणी लटकवून गळफास लावून घेतला.
दरम्यान ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली. या घटनेची फिर्याद मयत विश्वनाथ लाड यांचे बंधू विठ्ठल गणपती लाड यांनी पाटण पोलीस पोलिसांत दिली. पाटण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी ग्रामीण रुग्नालय पाटण येथे पाठवून रात्री उशिरा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेचा अधिक तपास हवालदार के. आर. खांडे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group