नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रेत्येक क्षेत्रात पुढे आला आहे. वर्षभरात करोना प्रतिबंधक लस तयार करून देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते CSIR च्या आज झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत दिलेल्या योगदानाविषयी त्यांचं कौतुक केलं.
From agriculture to astronomy, disaster management to defence technology, vaccine to virtual reality, India aspires to become self-reliant & empowered in every direction. India is leading world in fields of sustainable development & clean energy: PM during CSIR society meeting pic.twitter.com/t5tCtNmwsm
— ANI (@ANI) June 4, 2021
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतानं वर्षभरातच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचे फळ आहे. CSIR बद्दल लोकांना माहिती मिळायला हवी आपल्या देशातले वैज्ञानिक संशोधक अशा संदर्भातलं काम करत आहेत हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवं त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करून देण्याचा सल्ला मी देत आहे. असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणले, आपला देश आता सगळ्या क्षेत्रात पुढे जातोय आता आपल्याला योग्य नियोजन करून आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरुणांमुळे सध्या आपल्या प्रगतीचा वेग मंदावला असला तरी आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची करोनाकाळातली परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची आहे असंही यावेळी मोदी म्हणाले. यावेळी वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले.