हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार आहे आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे
बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर ४६ किमीने कमी होणार आहे
दरम्यान, रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी ३ जून २००० साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.
या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर हायड्रेंट, ५०० मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक १ किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. प्रत्येक त्याचबरोबर २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’