औरंगाबाद | हर्सूल जेलमध्ये एका कैद्याने त्याच्या मागणीसाठी उपोषण केले आहे. या कैद्याने काही दिवसांपूर्वी अन्नत्याग केला होता. त्यामुळे 5 दिवसांनी त्यांची प्रकृती खालावली आहे. या कैद्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
खून केल्याच्या आरोपावरून या आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्नत्याग केल्यामुळे त्या कैद्याची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात वॉर्ड क्र. 10 मध्ये उपचार सुरु आहेत. दिनांक 4 जून पासून त्याने उपोषण सुरु केले होते. प्रशासनाने माझ्या अर्जाची दखल घ्यावी. अशी मागणी या कैद्याने केली आहे.
काटकोर चव्हाण असे या कैद्याचे नाव असून एका खुणाच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्याला सहआरोपी म्हणून अटक केली होती. हा कैदी साडेचार वर्षापासून हर्सूल जेल मध्ये असून तो विवाहित आहे. त्याला तीन मुली एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. हा कैदी जेल मध्ये गेल्यानंतर त्याची पत्नी मुलांचा सांभाळ करत होती. परंतु कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील तिघांनी त्याच्या पत्नीला फूस लावून पळवून नेले असा आरोप काटेकोरपणे निवेदनात केला आहे. यामुळे त्यांचे चारही अपत्य रस्त्यावर आले असून त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नसल्याचे त्यांनी सांगितलं.
पत्नीला फूस लावून पळवून नेणाऱ्या त्या तिघांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी कर्जत पोलिसांना या कैद्याने केली होती. याबाबत कर्जत पोलिसांनी जबाब नोंदवले. परंतु हा प्रकार जाणून घेतल्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात येत नसल्यामुळे यावर पोलिसांनी आक्षेप घेतला नाही. मात्र काटेकोरने कर्जत पोलिसांनी हे प्रकरण दाबल्याचा आरोप बिडकीन पोलिस ठाण्यात हा प्रकार वर्ग करावा अशी त्यांनी मागणी केली. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या कैद्याने उपोषण केले. मुलांचा सांभाळ करण्यास कोणी नसेल तर मुलांसाठी सामाजिक संस्थेतर्फे काही सोय करता येते काय हे पाहून त्यांना राहणे खाणे आणि शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन अधीक्षक जयवंत नाईक यांनी दिले.