व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

Prithviraj Chavan Birthday Special Story

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण