फलटणला खासगी सावकारी फोफावली : डाॅक्टरसह दोघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | तालुक्यातील राजुरी येथील दोघांवर खासगी सावकारीप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश शंकर काळे (वय- 27) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून सावकारी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यात सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली असून त्यावर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजुरी (ता.फलटण) येथील गणेश बाळासो खुरंगे यांच्याकडून ईश्वर काळे व त्याचे मृत चुलते यांनी 10 टक्के व्याजाने 1 लाख रुपये घेतले होते. त्याच्या मोबदल्यात सन 2020 ते 9 जून 2021 पर्यंत वेळोवेळी 2 लाख 80 हजार रुपये दिले. तरीही संशयित गणेश बाळासो खुरंगे व त्याचा नातेवाईक डॉ. मधुकर गुलाबराव माळवे यांनी फिर्यादीस व्याजापोटी आणखी 2 लाख रुपये देण्याची मागणी केली.

तसेच वेळोवेळी फिर्यादीच्या दुकानावर जाऊन पैशासाठी दमदाटी, शिवीगाळ, घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या नावावरील 4 गुंठे जागा नावावर करून देण्यासाठी दबाव टाकत होते. संबंधित राजुरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने संबंधितावर भीतीपोटी तक्रार दाखल करत नव्हते. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

Leave a Comment