पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने मारहाण केली आहे. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली आहे. या बाऊन्सरने काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मयूर गायकवाड असे मारहाण करण्यात आलेल्या पालकाचे नाव आहे. बिबवेवाडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
या व्हडिओमध्ये महिला बाऊन्सर हातात काठी घेऊन पीडित मयूर गायकवाड यांना हात उचलता, असे म्हणत मारहाण करताना दिसत आहे. त्याचबरोबर चला बाहेर निघा असं म्हणत धक्का देता बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. या महिला बाऊन्सरबरोबर तिचा पुरुष सहकारीही त्या पालकाला हकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
पुण्यातील खाजगी शाळेची दंडेलशाही, तक्रार घेऊन आलेल्या पालकांना बाऊन्सरकडून मारहाण pic.twitter.com/MdP9vhIWQT
— The मराठी Medium (@MarathiMedium) March 12, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
पीडित मयुरेश गायकवाड हे बिबवेवाडी परिसरात राहतात. पीडित मयुरेश गायकवाड यांचा मुलगा त्या ठिकाणी असलेल्या क्लाईन मेमोरिअल स्कूल या शाळेत शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी पीडित पालक शाळेने भरायला लावलेल्या फीच्या रक्कमेबाबत प्रिन्सिपलकडे विचारणा करण्यासाठी शाळेत गेले होते. यावेळी मयुरेश गायकवाड यांच्यासह फी भरण्यासंदर्भात लेटर मिळालेले इतर पालकसुद्धा होते.
यावेळी शाळेत गेल्यानंतर पीडित पालक व इतर पालकांनी मिळवून त्यांचे लेखी म्हणणे प्रिन्सिपलकडे मांडून त्याची पोचपावती मागितली. मात्र याच वेळी शाळेच्या प्रिन्सिपल यांनी शाळेचे बाउन्सर बोलावून पीडितांसहा इतरांना धक्काबुक्की करत, ढकलून बाहेर काढण्यास सांगितले. यावेळी एका महिलेसह दोन पुरुष बाऊन्सर्संनी पालकांशी धक्काबुक्की, शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या शाळेवर कोणतीही कारवाई केलेली नाही.