Wednesday, October 5, 2022

Buy now

बाबा रामदेवची कंपनी 24 मार्चला सादर करणार FPO; 4300 कोटी रुपये उभारण्याची योजना

नवी दिल्ली । योगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजली आयुर्वेदच्या मालकीची रुची सोया ही खाद्यतेल कंपनी 24 मार्च रोजी फॉलोऑन पब्लिक ऑफर (FPO) आणणार आहे, ज्याद्वारे 4,300 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. रुची सोयाने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की,”बोर्डाच्या एका समितीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) ला मान्यता दिली आहे. बोर्डाने 24 मार्च 2022 रोजी बोलीसाठी इश्यू उघडण्यास आणि 28 मार्च 2022 रोजी बंद करण्यास मान्यता दिली.”

कंपनीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये FPO आणण्यासाठी देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली होती. रुची सोनाने जून 2021 मध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला होता. DRHP नुसार, रुची सोया काही थकित कर्ज फेडण्यासाठी, त्याच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी इश्यूमधून मिळणारे पैसे वापरतील.

पतंजलीने 2019 मध्ये रुची सोयाचे अधिग्रहण केले होते
पतंजलीने 2019 मध्ये रुची सोयाचे अधिग्रहण केले होते. पतंजलीने दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोयाला 4,350 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

प्रमोटर्सकडे सध्या सुमारे 99 टक्के हिस्सा आहे
कंपनीच्या प्रमोटर्सकडे सध्या 99 टक्के हिस्सा आहे. FPO च्या या फेरीत कंपनीला किमान 9 टक्के हिस्सा विकावा लागेल. सेबीच्या नियमांनुसार, कंपनीमध्ये किमान 25 टक्के सार्वजनिक भागीदारी असली पाहिजे,प्रमोटर्सना आपला हिस्सा 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी आहे.