हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, South Indian Bank साउथ इंडियन बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
29 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
बँकेच्या वेबसाइटनुसार, 29 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. बँक आता 7 दिवसांपासून 30 दिवसांच्या FD वर 2.65%, 31 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 3.25%, 91 ते 99 दिवसांच्या FD वर 4.25% तर 100 दिवसांच्या FD वर 5.50% व्याजदर देत आहे. Bank FD
आता बँक 7 दिवस आणि 10 वर्षाच्या FD वर सर्वसामान्यांना 2.65% ते 6.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.15% ते 6.50% पर्यंतचा व्याजदर देत आहे. तसेच, नॉन-ज्येष्ठ नागरिकांना 500 दिवसांच्या डिपॉझिट्सच्या कालावधीवर जास्तीत जास्त 7.40% रिटर्न मिळेल. त्याच प्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना आता 1 वर्ष आणि 1 दिवसांच्या डिपॉझिट्सच्या कालावधीवर जास्तीत जास्त 7.50% रिटर्न मिळेल.
South Indian Bank FD Rates
101 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 4.25%
181 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.60%
1 वर्षाच्या FD वर 6.60%
1 वर्ष आणि 1 दिवसांच्या FD वर 7.00%
1 वर्ष 2 दिवस ते 499 दिवसांच्या FD वर 6.50%
500 दिवसांच्या स्पेशल FD वर (SIB 94 Plus) 7.40%
501 दिवस ते 30 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.50%
30 महिन्यांच्या FD वर 7.00%
30 महिन्यांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50%
5 वर्ष ते 66 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.00%
66 महिन्यांपर्यंतच्या FD वर 6.50%
66 महिन्यांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.00%
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestratelist.aspx
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये