हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रासाठी आणि काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी राजीव सातव यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी खूपच भावुक झाल्या. आम्ही जसं वडील राजीव गांधी यांना वयाच्या 46 व्या वर्षी गमावलं, तसंच राजीव सातव यांनाही ते 46 वर्षांचे असतानाच गमावलंय अस म्हणताना प्रियांका गांधींचा कंठ दाटून आला.
प्रियंका गांधी म्हणाल्या, “ज्या वयात माझे वडील माझ्यापासून हिरावले गेले त्याच वयात राजीव सातव हेही हिरावले गेले. मनात विचार आला की त्यांचंही नाव राजीवच होतं आणि यांचंही. राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचंही वय 46 वर्षे होतं आणि राजीव सातव यांचंही वय 46 वर्षेच होतं. या माणसात एक उज्वल भविष्य, समोर संपूर्ण आयुष्य, देशासाठी काही तरी करण्याची इच्छा आणि क्षमताही होती. त्यांच्या जाण्यामुळे घरातील सदस्य गमावल्याचं दुःख होत आहे.”
Condolence message by Smt @priyankagandhi at prayer meeting of Late Rajeev Satav pic.twitter.com/9DiT8KAute
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 19, 2021
अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे असे प्रियंका गांधी यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.