प्रियंका गांधी विलगीकरणात, आसाम दौरा रद्द, व्हिडिओ द्वारे सांगितली माहिती

वृत्तसंस्था : देशातील अनेक नेत्यांना आणि सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाढेरा यांचे पती रॉबर्ट वाढेरा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.त्यामुळे त्या विलगीकरणात असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती स्वतः त्यांनी व्हिडिओद्वारे दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओ द्वारे त्यांनी म्हटलं आहे की, “नुकताच कोरोना संक्रमणामुळे मला माझा आसाम दौरा रद्द करावा लागला. माझा कालचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढचे काही दिवस आयसोलेशन मध्ये राहणार आहे. या गैरसोयीबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून केला आहे.

निवडणूक आयोगाला सवाल

दरम्यान देशात आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. आसाम मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याच्या मुद्द्यावरून देखील प्रियंका गांधी वढेरा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांनी म्हंटले आहे की, निवडणूक आयोगाची गाडी खराब झाली त्यानंतर तिथं एक वाहन आले. हे वाहन भाजपच्या उमेदवाराचे असल्याचे दिसून आले. आणि निवडणूक आयोगाचे लोक त्यामधून प्रवास करतात. प्रिय EC हे प्रकरण काय आहे? यावर तुम्ही देशाला काही स्पष्टीकरण देऊ शकाल का? की आपण सर्वजण एकत्रित पणे आयोगाच्या निष्पक्षते बद्दल बोलू शकतो? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

You might also like