भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडलेल्या ठिकाणी पुन्हा होणार मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था : आसाम मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ई व्ही एम मशीन सापडल्याने एकच खळबळ उडाली . मात्र आता या मतदारसंघात पुन्हा एकदा मतदान घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तसेच या प्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आणि त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागवला आहे.

भाजप अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

दरम्यान या सर्व प्रकरणाविषयी भाजप अधिकाऱ्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे की, आयोगाची गाडी बंद पडल्याने ई व्ही एम मशीन नेताना भाजप उमेदवाराच्या गाडीचा वापर केला गेला. संपूर्ण देशाचं लक्ष हे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सुरू असलेल्या निवडणुकीवर असताना आसाममध्ये असा प्रकार घडल्याने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे.

दरम्यान या घटनेनंतर मात्र भाजपा विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘EC कि गाडी खराब, भाजप कि नियत खराब, लोकतंत्र की हालत खराब!

 

Leave a Comment