जन्मदात्या पित्याला यकृतदान करून दिले नवजीनव; प्रियंकावर होतोय कौतुकांचा वर्षाव

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई । १५ डिसेंबर २०२१: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून हे ओळखले जाते. यावेळी तज्ञांनी कोविडच्या आधी आणि नंतरच्या काळात झालेल्या यकृत प्रत्यारोपणाच्या काही उल्लेखनीय केसेस आणि सर्जरीमध्ये घडून आलेल्या नवीन प्रगतीबाबत चर्चा केली. यकृत प्रत्यारोपण सर्जरी झालेले रुग्ण दीर्घकाळपर्यंत आपले आयुष्य जगू शकतात ही बाब गेल्या काही वर्षांपासून स्पष्टपणे दिसून येत आहे, पण तरीही या क्षेत्रात अजून बऱ्याच सुधारणा होणे गरजेचे आहे. २२ वर्षांच्या प्रियंका सेलने आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा एक भाग दान केला. श्री. दिलीप सेल मुंबई पोलीस (मालाड पोलीस स्टेशन) मध्ये पीएसआय आहेत, ज्यांचे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये यकृत प्रत्यारोपण केले गेले. ते पूर्णपणे बरे झाले आणि प्रत्यारोपणानंतर काही महिन्यांच्या आत त्यांना पोलीस सब इन्स्पेक्टरचे प्रमोशन देखील मिळाले.

डॉ. विक्रम राऊत, कन्सल्टन्ट – एचपीबी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, ‘’आम्ही अशा कितीतरी केसेस पाहिल्या आहेत ज्यामध्ये रुग्ण जिवंत राहू शकेल याची शक्यता खूपच कमी होती, त्यानंतर त्यांचे प्रत्यारोपण केले गेले आणि मग ते स्वतःचे सर्वसामान्य आयुष्य खूपच उत्तम प्रकारे जगत आहेत. आपल्यासोबत आज श्री. दिलीप सेल आहेत, ते एक पोलीस अधिकारी आहेत आणि इथे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये त्यांचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. सर्जरी यशस्वी झाली, त्यानंतर त्यांनी आपले सामान्य जीवन जगायला सुरुवात केली आणि काही महिन्यांच्या आत त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन देखील मिळाले. आमची अजून एक चाईल्ड पीडियाट्रिक लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपियन्ट आहे जिने तिच्यासमोरील आव्हानांशी झुंज दिली आणि ती पुन्हा शाळेत देखील जाऊ लागली. आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की ती आज एक निरोगी जीवन जगत आहे.”

यकृत प्रत्यारोपणानंतर आपले सर्वसामान्य जीवन जगत असलेले पोलीस सब इन्स्पेक्टर – मालाड पोलीस स्टेशन श्री. दिलीप सेल यांनी सांगितले, “मला यकृताचा आजार बऱ्याच काळापासून त्रास देत होता. दुर्भाग्याची बाब म्हणजे मला हेपेटायटिस बी आणि कोविड-१९ चे देखील निदान केले गेले. जेव्हा डॉ विक्रम राऊत यांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला तेव्हा माझी शूर मुलगी पुढे आली आणि तिने आपल्या यकृताचा हिस्सा दान करून माझा जीव वाचवला. आता मी माझे सर्वसामान्य आयुष्य जगतो आहे, इतकेच नव्हे तर, मला काही महिन्यांच्या आत प्रमोशन देखील मिळाले. डॉ विक्रम राऊत यांनी मला जीवन जगण्याची दुसरी संधी मिळवून दिली.”

श्री.संतोष मराठे, सीओओ – युनिट हेड, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले की, “अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप आपले सर्वोत्तम, अनुभवी डॉक्टर्स आणि अत्याधुनिक व सर्वात प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या पायाभूत संरचनेसह भारतात सहज उपलब्ध होऊ शकतील अशा व किफायतशीर, जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करण्यात मापदंड स्थापित करण्यात सर्वात आघाडीवर आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या ऑर्गन ट्रान्सप्लांट टीममध्ये देशातील काही सर्वश्रेष्ठ व अनुभवी ट्रान्सप्लांट सर्जन्स आहेत. जे जगातील सर्वोत्तमाच्या तोडीचे आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here