कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डीस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व प्रो.कब्बडी खेळाडू गिरीश इरनाक याने उपस्थिती लावली. “गतवेळी 2017-18 साली लिबर्टी मजदूर मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेवेळी महाराष्ट्राला अकरा वर्षांनंतर अजिंक्यपद मिळाले, हा अतिशय चांगला योगायोग होता. लिबर्टी मजदूर मंडळ हे अतिशय जुने क्रीडा मंडळ आहे. या मंडळाला एक दैदिप्यमान गौरवशाली इतिहास आहे,”असे गौरवोद्गार खेळाडू गिरीश इरनाक याने काढले.
कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्यावतीने आयोजित स्पर्धेत लिबर्टी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते गिरीश इरनाक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अरुण जाधव, ज्येष्ठ संचालक अँड. मानसिंगराव पाटील, मुनीर बागवान, काशिनाथ चौगुले, रमेश जाधव, सुहास डोळ, उत्तम माने, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, राजेंद्र पवार, विनायक पवार, भास्कर पाटील, बाळासाहेब मोहिते, नंदकुमार बटाणे, विजय गरुड, राजेंद्र जाधव, सचिन पाटील यांच्यासह लिबर्टी मजदूर मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय व प्रो कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आल्यानंतर खेळाडूंमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी सदर खेळाडूंशी संवाद साधला व अनेकांनी त्यांच्या खेळाचे कौतुक केले. तसेच लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेमधील खेळाडूंची ओळख व नाणेफेक गिरीश इरनाक यांच्याकडून करण्यात आले.