हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PPF : कोरोना काळाने आपल्याला कधीही पैशांची गरज भासू शकते याची जाणीव करून दिली आहे. यासाठी भविष्यातील सुरक्षिततेसाठी आपल्याकडे पुरेसा एमर्जन्सी फंड असणे जरुरीचेआहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. मात्र, 15 वर्षे लॉक असल्याने आपण याला एमर्जन्सी फंड म्हणू शकणार नाही. मात्र, PPF मध्ये 7 वर्षांनंतर आंशिक पैसे नक्कीच काढता येतील.
PPF चे नियम जाणून घ्या
PPF मध्ये जमा असलेले पैसे 15 वर्षांनी मॅच्युर होतात. म्हणजेच त्यामध्ये जमा असलेले पैसे आपल्याला मॅच्युरिटीनंतरच काढता येतात. मात्र भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन यामध्ये आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील मिळते. तसेच हे खाते उघडल्याच्या सात वर्षानंतरच आपल्याला यातून आंशिक रक्कम काढता येईल.
प्रत्येक आर्थिक वर्षात फक्त एकदाच पैसे कशा काढता येणार
हे जाणून घ्या कि, PPF च्या नियमांनुसार खातेदारांना प्रत्येक आर्थिक वर्षात फक्त एकदाच आंशिक पैसे काढण्याची सुविधा दिली जाईल. याबरोबरच PPF खाते काही कारणास्तव पाच वर्षांनंतर मुदतीआधीच बंदही केले जाऊ शकते. जर आपल्याला PPF खात्यातून थोडे अथवा सर्व पैसे काढायचे असतील तर त्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म सी भरावा लागेल.
पीपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया जाणून घ्या
पीपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी बँकेच्या वेबसाइटवर जाऊन पीपीएफ काढण्याचा फॉर्म डाउनलोड करा. ज्याला फॉर्म सी असेही म्हंटले जाते. तसेच हा फॉर्म बँकेच्या शाखेतूनही घेता येईल.
फॉर्म C भरावा लागेल
पीपीएफमधून पैसे काढण्यासाठी फॉर्म C मध्ये आपले डिटेल्स भरावे लागतील. या फॉर्म सीमध्ये तीन भाग असतात. यातील पहिला भाग म्हणजे डिक्लरेशन. यामध्ये आपला पीपीएफ खाते क्रमांक आणि काढायची रक्कम टाकावी लागेल. येथे एका स्तंभात, या खात्याचा कालावधी देखील विचारला जाईल. जर आपण अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढत असाल तर त्याचे नाव देखील टाकावे लागेल. दुसरा भाग ऑफिशियल वापरासाठीचा आहे. यामध्ये बँकेचे पीपीएफ खाते उघडण्याची तारीख, एकूण रक्कम, पैसे काढण्याची तारीख, उपलब्ध रक्कम, मंजूर रक्कम टाकली आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला सही करावी लागेल.
ही कागदपत्रे द्यावी लागतील
PPF विथड्रॉल ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला फॉर्मवर रेव्हेन्यू स्टॅम्प चिकटवावा लागेल आणि त्यावर सही करावी लागेल. यासोबतच आपले पीपीएफ पासबुक द्यावे लागेल. यानंतर आपली मंजूर झालेली रक्कम थेट आपल्या बँकेच्या बचत खात्यात जमा केली जाईल. यामध्ये आपल्याला डिमांड ड्राफ्टसाठीही रिक्वेस्ट करता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!!
टाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल
HSBC Bank ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली