साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलावाचे पालिकेतर्फे आज ओटीभरण…

Kas lake
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तलाव, ओढे भरून ओसंडून वाहू लागले आहेत. सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारे कास धरणही भरले आहे. त्यामुळे आज कास धरणाच्या ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा पालिकेच्या नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते साडी, खण आणि नारळ आदींनी तलावातील पाण्यात ओटी भरली जाणार आहे. कास तलाव दोन दिवसांपूर्वी ओव्हर फ्लो झाला असून तलावात 0.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तलाव भरल्यामुळे सातारकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे. त्याच्या सांडव्यावरील पायऱ्यावरून पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

वर्षभर सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव भरून वाहू लागल्यावर कृतज्ञता म्हणून ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा कार्यक्रम घेता आला नाही. यावर्षी ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आवर्जून उपस्थित असतात. मात्र, उदयनराजे भोसले हे संसदीय कामकाजानिमित्त दिल्लीत असल्यामुळे या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार नाहीत.