सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील महाबळेशवर व पाचगणी अशा ठिकाणी धुके पसरू लागलेले आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. महाबळेश्वर शहरात शनिवार आणि रविवार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. मात्र, पर्यटन स्थळावर फिरण्यास मनाई असल्याचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात जिल्ह्यात जमावबंदी आहे तर शनिवार-रविवार संचारबंदी आहे. यामुळे सोमवार ते शुक्रवार या काळात महाबळेश्वर शहरात पर्यटकांना येण्यास मुभा दिली जाईल. तसेच या काळात फिरण्यासही मुभा दिली जाईल. परंतु शनिवार -रविवार संचारबंदी असल्याने पर्यटन स्थळावरती जाण्यास मनाई असणार आहे.
शनिवार-रविवार महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. मात्र पर्यटन स्थळावर फिरण्यास मनाई :- मुख्याधिकारी पल्लवी पाटील.@maha_tourism @HelloMaharashtr pic.twitter.com/1KSgu6vs5N
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) June 19, 2021
महाबळेश्वर शहरात अद्याप पर्यटन स्थळे फिरण्यासाठी सुरू केलेली नाहीत. शुक्रवारी प्रांताधिकारी यांनी दिलेला आदेश आणि त्यानंतर शनिवारी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशामुळे पर्यटकांच्या संभ्रमावस्था निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.