महत्वाची सूचना ! शासनाने जारी केले नियम, सर्व लोकांनी 30 जूनपूर्वी हे काम करावे अन्यथा …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही देशातील सर्वात महत्वाची कागदपत्रे आहेत. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापासून ते मोठ्या बँकिंगच्या व्यवहारापर्यंत पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय इतरही अनेक आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड (PAN Card) असणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, आधार कार्ड अनेक कामं करण्यासाठी आणि ओळख दर्शविण्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत इनकम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 निश्चित केली आहे.

जर या तारखेपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसेल तर आपल्याला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. चला तर मग आपल्या पॅनला आधारशी जोडण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात …

1000 रुपये दंड आकारला जाईल
30 जूनपर्यंत तुम्ही पॅनशी आधार जोडला नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. इनकम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये कलम 234 एच जोडल्यामुळे हे घडले आहे, जे सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेले आर्थिक विधेयक 2021 च्या अंतर्गत मंजूर केले. दंडा व्यतिरिक्त आपले पॅन कार्ड देखील निष्क्रिय केले जाईल.

याप्रमाणे ऑनलाईन लिंक केले जाऊ शकतात.

>> सर्व प्रथम इनकम टॅक्स वेबसाइटवर जा.

>> आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक एंटर करा.

>> जन्माचे वर्ष आधार कार्डमध्ये दिले असल्यास चौकोनात टिक करा.

>> आता कॅप्चा कोड एंटर करा.

>> आता लिंक आधार बटणावर क्लिक करा

>> आपला पॅन आधारशी जोडला जाईल.

SMS द्वारे लिंक अशा प्रकारे करता येते

आपल्याला आपल्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल. यानंतर, 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक एंटर करा. आता स्टेप 1 मध्ये नमूद केलेला SMS 567678 किंवा 56161 वर पाठवा.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment