पुस्तकांच्या दुनियेत । प्रविण दाभोळकर
रूईया महाविद्यालयात रवि आमले सरांचं प्रोपगंडा या विषयावरचं व्याख्यान ऐकलं होतं. त्यानंतर याविषयाबद्दलची उत्सुकता वाढली होती. लाॅकडाऊनच्या ४ दिवस आधी विषय पुन्हा आठवला आणि सहज म्हणून सरांची वाॅल पाहीली. तर या विषयावर त्यांनी लिहिलेलं एक पुस्तकं असल्याचं कळालं. लगेच त्या लिंकवर जाऊन मागवलं. मागच्या काही दिवसात हे वाचून संपलं. खूप चांगलं पुस्तकं वाचल्याचं समाधान मिळालं.
टीव्ही, दैनिकं, सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्या मनावर कशी बिंबवली जाते? कालांतराने ती गोष्ट आपल्याला खरी कशी वाटू लागते? एखाद्या वस्तूचा खप अचानक कसा वाढतो? एखादा नेता अचानक लोकप्रिय तर एखादा नेता अचानक तुच्छ कसा काय वाटू लागतो? तर या सगळ्यामागे असलेलं अदृश्य सरकार काम करतं असतं. प्रोपगंडा काम करत असतो. जो जनसामान्यांचा कलं कोणत्या दिशेने आहे? याचा विचार करतो आणि त्यानुसार पाऊलं उचलतो.
प्रोपगंडा करताना माहिती जाणिवपूर्वक पेरली जाते. महत्वाची माहिती दाबून ठेवणे, आपल्याला हवी तितकीचं माहीती देणे आणि तिचा हवा तसा वापर करणे हे प्रोपगंडाकार करत असतात. अनेकदा टीबी, कॅन्सर सारख्या समाजपयोगी जाहीराती पटवून देण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. पहिल्या महायुद्धात युद्धज्वर वाढवण्यासाठी ब्रिटनने प्रपोगंडाचा वापर सफाईदारपणे केल्याचा पाहायला मिळतो. नंतर हिटलर तर याचं विद्यापीठंच होतं. प्रचारतंत्राचा वापर करून एखाद्याची प्रतिमा उच्च स्तरावर नेऊन ठेवायची आणि त्याला विरोध करणारे हे कसे देशद्रोही आहेत हे लोकांच्या मनात बिंबवण्याचे काम या माध्यमातून होत असे.
पुस्तकवेड्या लोकांसाठी बी ह्युमनिस्ट वेबसाईट घेऊन आलीय पुस्तकांच्या अनोख्या कल्पना. माहिती घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://behumanist.com/?ref=hellomaha
पहिल्या महायुद्धापासून ते भारतातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये प्रोपगंडाचा कसा वापर झाला ? हे या पुस्तकात वाचायला मिळेल. राजकिय मंडळी जसा याचा वापर करतात तसे जाहीरातदार ही आपल्या वस्तूंची विक्री वाढण्यासाठी हे तंत्र वापरतात. “अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात केलाय.
मीठ तेच पण “देश का नमक” टॅग जोडून त्याला देश भावनेशी कसं जोडलं जातं. डेअरी मिल्कमध्ये आळ्या सापडल्यानंतर त्यांच्या ३० टक्के विक्रीवर परिणाम झाला. पण मग नव्या पॅकींगमध्ये येऊन डेअरी मिल्क पुन्हा सर्वांना आवडू लागली. दिवाळीत मिठाईची जागा कॅडबरीने व्यापून टाकली. या आणि अशा हजारो परिणामकारक जाहीरातींमागे काय विचार असतो. हे या पुस्तकातून वाचता येणार आहे. पुस्तकात एकूण ४० प्रकरणं आहेत. पहिल्या ३० प्रकरणात पहिल्या महायुद्धात प्रोपगंडाशी संबंधित महत्वाची उदाहणं, हिटलरने करून घेतलेला प्रोपगंडाचा वापर, प्रोपगंडाचे प्रकार, त्याला बळ देणाऱ्या इतर घटना, पीआर तंत्र याबद्दल वाचायला मिळतं. त्यानंतरची १० प्रकरणं ही भारतीय राजकारण आणि जाहिरातीशी संबंधित आहेत. वाचून संग्रही ठेवण्यासारखंच हे पुस्तक आहे.
behumanist.com या साईटवर हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
प्रोपगंडा
लेखक – रवि आमले
मूल्य :- ४०० रूपये