हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुंबईच्या लोकप्रिय अशा लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येत आहेत, त्यांना येउद्या, पण मला सारखी भीती वाटते कि ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे एकदिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला. तसेच ही सर्व लोक महाराष्ट्राला आपला दुश्मन मानतात त्यामुळे ते काहीही करू शकतात असेही संजय राऊत यांनी म्हंटल.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री म्हणून त्यांना मुंबईत येण्यासाठी त्यांना परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आमचा अमित शाहांना विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, रोजगाराबरोबरच अनेक महत्त्वाची आर्थिक केंद्रं गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाह यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तिव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत. पण ते कमजोर गृहमंत्री आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जम्म-ूकाश्मीर असेल मणिपूर असेल किंवा इतर भागांचाही विचार केला तर या गृहमंत्र्यांचं देशाच्या सुरक्षेकडे अजिताब लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लुटमार याना पाठिंबा देतात. मुंबईला लुटलं. लुटमार करणाऱ्यांना पाठिंबा देतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे अशा प्रकारची कामे त्यांनी केली. ही गृहमंत्र्यांची कामं नाही. त्यामुळे महाराष्ट्राची जनता अमित शाह याना शत्रू मानते. आज ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येत आहेत, त्यांना येउद्या, पण मला सारखी भीती वाटते कि ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे एकदिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाही का?
हे होऊ शकतं. हे लोक काहीही करु शकतात. लालबागचा राजाचे एवढं मोठं नाव आहे, त्याच्या दर्शनाला देशभरातून लोक येतात त्यामुळे चला गुजरातला घेऊन चला असं ते करु शकतात. लालबागचा राजा गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्तावही देऊ शकतात. लालबागचा राजा उद्यापासून गुजरातमध्ये पाहिजे, असं म्हणतील. हे व्यापारी लोक आहेत. मी सांगतोय तुम्हाला आणि फार विचार करुन सांगतोय, कारण अमित शाह हे महाराष्ट्राला आपला दुष्मन मानतात असं संजय राऊत यांनी म्हंटल.