Prostate Cancer | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा ताण, बैठे जीवनशैली यामुळे अनेक आजार वाढत आहेत. खास करून पुरुषांना विविध मानसिक आणि शारीरिक आजारांचा सामना करावा लागत आहे. सहसा पुरुष आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्या कोणालाही सांगत नाही. परंतु हळूहळू या समस्या एका मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होतात. ज्या मधून सुटका मिळवणे खूप कठीण होऊन जाते. म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे शरीरात दिसली, तर त्यावेळी उपचार घेणे खूप गरजेचे असते. आज काल पुरुषांमध्ये देखील एक प्रकारचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर चा (Prostate Cancer) धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. याला एक मुक कर्करोग असे म्हणतात. जो अगदी शांतपणे शरीरामध्ये वाढत जातो. सुरुवातीला त्याची लक्षणे सहसा दिसत नाही. परंतु हा कॅन्सर हळूहळू संपूर्ण अवयवात पसरतो. आणि नंतर त्यातून वाचणे खूप कठीण होऊन जाते. एका अभ्यासात असे समोर आलेले आहे की, दोन पैकी एका पुरुषाला प्रोस्टेट कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला जी काही लक्षणे दिसतात. त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे
लघवीमध्ये बदल
जर तुम्हाला अचानक लघवीला त्रास झाला किंवा लघवीचा प्रवाह कमी झाला तसेच वारंवार लघवीला होणे, लघवीतून रक्त येणे लघवीचा रंग वेगळा येणे, यांसारखी लक्षणे दिसली, तर हे प्रोस्टेट कर्करोगाचे एक सौम्य लक्षण आहे.
रात्री लघवीला उठणे
तुम्हाला जर रात्री झोपेत देखील लघवी येत असेल, तर हे देखील एक प्रोस्टेट कर्करोगाचे सौम्य असे लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
अशक्तपणा किंवा थकवा येणे
जर तुम्ही पुरेशी झोप घेतली असेल विश्रांती घेतली असेल, तरी देखील तुम्हाला सतत थकवा येत असेल. अशक्तपणा जाणवत असेल, तसेच भूक देखील लागत नसेल, तरी देखील तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे.
पाठ दुखी
जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय पाठीमध्ये वेदना होत असेल, तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण हे एक प्रोस्टेट कर्करोगाचे मोठे लक्षण आहे. हा कर्करोग जेव्हा हाडांमध्ये पसरू लागतो. त्यावेळी पाठ दुखीची समस्या निर्माण होते. त्यामुळे लवकरच डॉक्टरांशी संपर्क साधा.
शरीरावर गुठळ्या तयार होणे
शरीरावर कुठेही गुठळ्या दिसणे ही एक चिंतेची बाब आहे. जर पुरुषांमध्ये शरीरावर अशा कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या निर्माण झाल्या असेल, तर त्याकडे अजिबात लक्ष न देता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोट दुखी आणि अपचन
जर पुरुषांना पोटाच्या वरच्या भागात असामान्य वेदना होत असतील, तरी हे देखील प्रोस्टेट कर्करोगाचे एक मोठे लक्षण आहे. जर तुमचे वजन वारंवार कमी होत असेल. आणि सारखा खोकला येत असेल, तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.