दरवाढ विरोधात आंदोलन : कराडला चूलीवरचा चहा मोफत वाटून मोदी सरकारचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पेट्रोल, डिझेल व घरगूती सिलेंडरचे दर वाढवणार्‍या केंद्र सरकार विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी चुलीवर चहा बनवून तो नागरिकांना मोफत वाटप करीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गॅस शेगडी मोफत दिले, मात्र आता गॅस टाकी भरून आणणे भरणे परवडत नाही.

सध्या देशभरात डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅस यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. या वस्तूचे दर दोन वर्षापूर्वी निम्यावर होते. आज शेतीमालाचा दर, कामगार व मजुरांची मजुरी वाढलेली नाही, त्यामुळे देशातील सामान्य जनता व महिला वर्ग हैराण झालेला आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असून बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे या भाववाढीचा जाहीर निषेध करीत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.

कराड येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय समोर उपस्थित आंदोलक महिलांनी चूल तयार करत या चुलीवर चहा बनवला. त्यानंतर तो चहा नागरिकांना मोफत वाटप करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, विश्वास जाधव सुनील कोळी, अविनाश फुके, प्रकाश काळे, पोपट जाधव, उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांना बळीराजा संघटनेच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Leave a Comment