कराडात जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध : सरकार विरोधात घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने केलेल्या निलंबनाचा जाहीर निषेध कराड येथे नोंदविण्यात आला. तसेच प्रातांधिकारी उत्तम दिघे यांना निलंबन केल्याबाबत जाहीर निषेध नोंदवत असल्याचे निवेदन देण्यात आले.

कराड येथील प्रशासकीय इमारती समोर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच 50 खोके एकदम अोके, जयंत पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी युवक काॅंग्रेस प्रदेश सदस्य नवाज सुतार, सातारा जिल्हा सरचिटणीस महमंद आवटे, कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, समीर संदे, अॅड. प्रताप पाटील, धनंजय कुंभार, जाबीर वाईकर, अजय सुर्यवंशी प्रताप भोसले, रोहित कांबळे, अजित भोसले, समीर कुडची, सतिश भोंगाळे, रविंद्र मुंढेकर, मंगेश वास्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या नागपूर मध्ये अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात सर्वांना बोलण्याचा अधिकार असतो. पण सत्ताधारी लोक नेहमी अधिवेशनात गोंधळ करून आलेले विषय झटकण्याचा प्रयत्न करत असतात. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ही बोलू दिले नाही. त्यांच्यावर हुकूमशाही पध्दतीने निलंबन कारवाई केली. जयंत पाटील हे एक अभ्यासू आणि शांत नेते आहेत. त्यांनी अनेक महत्वाची पदे महाराष्ट्र राज्यात भूषवली असून 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांना लोकसेवेसाठी राहिला आहे. तरी देखील जाणुन बुजून ठरवून कारवाई गेली आहे. त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करतो. तसेच जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई त्वरित मागे घ्यावी.