सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथील अँड. राममोहन खारकर यांच्यावर शाहूनगर परिसरात शनिवार दि. 12 रोजी रात्री 10.30 ते 11.00 च्या सुमारास जबरी प्राणघातक हल्ला करणेत आला. त्यात त्यांचे उजवा डोळ्यावर घाव झाल्याने तो कायमस्वरूपी निकामी झाला आहे. अशाप्रकारे त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या निषेध सभा घेण्यात आली. या सभेस सर्व वकिल सभासदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. सातारा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. तसेच या घटनेचा निषेध नोंदविण्याचा ठराव ही घेण्यात आलेला आहे. सातारा न्यायालय व सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयातील वकिल सभासदांनी कामकाज बंद ठेवले होते.
या घटनेच्या निषेधासाठी सातारा न्यायालयामध्ये झालेल्या निषेध सभेचे प्रस्ताविक सातारा वकिल संघटनेचे उपाध्यक्ष अँड. चंद्रकांत बेबले यांनी केले. त्यावेळी त्यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच घडलेल्या घटनेचा मागील दोन दिवसाचा आढावा सभागृहास दिला व सुरू असलेल्या तपासाची माहिती सभागृहास अवगत केली. यानंतर अँड. नितीन वाडीकर, अँड. शामप्रसाद बेगमपूरे, अँड. पी. एन. पवार, अँड. सुभाष देशमुख, अँड. मिलिंद ओक, अँड. महेश कुलकर्णी, अँड. प्रशांत खामकर आदी वकिलांनी आपले भावना व्यक्त करून मत मांडले.
सर्व सभासदांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून न्यायालयीन कामकाजापासून एक दिवसासाठी अलिप्त राहणेचा निर्णय केला. याबाबतचे निवदेन जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधिक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे घटनेकडे गांभिर्याने पाहणेसाठी विनंती केली आहे. सध्या वकिलांवर हल्ले होण्याच्या घटनामध्ये वाढ झालेली आहे. तरी याकडे राज्यशासनाने देखील गांभियान पाहून वकिलांना संरक्षण देणारा कायदा निर्माण करणेत यावा यासाठी देखील मागणी केलेली आहे.तसेच या घडलेल्या घटनेमधील दोषी आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे व त्यांचेवर जास्त जास्तीत कठोर कायदेशरी कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे सुचित केले आहे.
या घटनेचा तीव्र निषेध सातारचे प्रमुख जिल्हा न्यायाधिश मंगला घोटे यांनी केला. सभेस कार्यकारणीतील अँड. स्वाती गव्हाणे, अँड. पृथ्वी पवार, अँड. अनुप लकड़े, अँड. आदित्य पाध्याय, अँड. योगेश काळंगे, अँड. करण पालकर, अँड. ऋषाली गाढवे, अँड. पुनम कुंभार, अँड. पेंढारी व सभासद उपस्थित होते. या निषेध सभेचा ठराव अँड. सुखदेव पाटील यांनी मांडला त्यास सभासदांनी अनुमोदन दिले. तर प्रास्ताविक अँड. चंद्रकांत बेबले उपाध्यक्ष यांनी केले आहे. उपस्थितांचे आभार अँड. संभाजी कदम सचिव यांनी मानले.