सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याची घटना घडली. या घटनेचे मोठे पडसाद महाराष्ट्र राज्यात उमटू लागले आहेत. कर्नाटक राज्याच्या राजधानी बंगळूरात विटंबना झाल्यानतंर मराठ्याची राजधानी साताऱ्यात छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच या घटनेचा निषेधही करण्यात आला. त्याचबरोबर कराडतही विविध संघटना व राजकीय पक्षांनी एकत्रित येवून दत्त चाैक येथे निषेध करत घोषणा दिल्या.
राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्यासह नागरिकांनी ठिकठिकाणी या घटनेचा निषेध केला आहे.
सातारा येथील पोवई नाक्यावर असलेल्या छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तेथे छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांच्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच विटंबना करणाऱ्या दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.