टीम, HELLO महाराष्ट्र – रस्ता दुरूस्त न करताच केल्या जाणाऱ्या टोल वसुली विरोधात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलय. नागरिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे कासेगाव-टाकळी या बाह्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
पंढरपूर जवळील टाकळी येथे अशोका ब्रिज वे कंपनीचा टोल नाका आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाहनांकडून टोल वसुली केली जाते. परंतु टोल पासून 11 किलो मीटर या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. परंतु कंत्राटदाराकडून मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.