रस्त्यांवरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

नेर्ले येथील माने गल्लीतील युवकांनी एकत्र येत खड्डेमय झालेल्या जिल्हा परिषदेच्या महादेव मंदिर ते नांगरे विहीर पर्यन्त रस्त्यावर रांगोळी काढून निषेध व्यक्त केला. गेल्या १५ वर्षांपासून हा रस्ता खड्डयांनी व्यापला आहे. याकडे जिल्हा परिषद, बांधकाम विभाग इस्लामपूर यांचे दुर्लक्ष आहे रांगोळी काढल्यानंतर तरी प्रशासन व प्रतिनिधी लक्ष देणार का असा सवाल ग्राहक पंचायतचे तालुका सदस्य अजित माने यांनी केला आहे.

अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरीकरण झालेले नाही त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनधारक व शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. हा रस्ता माजी सभापती स्व.शिवाजीराव देशमुख यांच्या फंडातून 15 वर्षांपूर्वी झाला होता त्यानंतर या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे व लोकांना त्रास होत असल्याने माने गल्लीतील युवकांनी निषेध व्यक्त केला.

मतं मागायला लोकप्रतिनिधी आणि कर गोळा करायला पालिका कर्मचारी येतात. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेची कोणी दखल घेत नाही अशा प्रतिक्रिया तिथले नागरिक व्यक्त करत आहेत.  दररोज ये- जा करताना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे लोकांमध्ये लोकप्रतिनिधिंप्रती एक प्रकारची संतापाची भावना आहे.

Leave a Comment