Wednesday, February 8, 2023

ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आघाडी सरकार विरोधात निदर्शने

- Advertisement -

औरंगाबाद | ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज सकाळी औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. एमपीएससी करणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून ठाकरे सरकारने घेतलेला बळी असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कोणताही निर्णय घेत नाही कधी त्यांचे वेळापत्रक बदलले जाते तर कधी निकाल लावले जात नाहीत या होणाऱ्या दिरंगाईला कंटाळून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

या आंदोलनात स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी राज्य समन्वयक दत्तात्रय जांभुळकर, महेंद्र मुंडे, भुपेस कडु, गजानन पालवे आदि विद्यार्थी उपस्थित होते.