वाढत्या महागाईमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने

औरंगाबाद : महागाई मुळे सर्वस्थारातून केंद्रसरकार व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निदर्शने होतात. असेच निदर्शन शहरात झाले आहे. खाद्यतेल आणि इंधनाचे भाव शंभरीपार गेले आहे. त्यावर नागरिक निराशा व्यक्त करत आहे.

यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाई वाढवल्या बद्दल केंद्र सरकार विरोधात पैठण गेट येथे निदर्शने करण्यात आले.या निदर्शनांमध्ये आंदोलनकर्त्यांनी ‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ आशा प्रकारचे फलक हातामध्ये घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली.

यावेळी राम बाहेती अश्फाक सलामी अभय टाकसाळ भास्कर लहाने मधुकर खिल्लारे विकास गायकवाड अनिता हिवराळे राजू हिवराळे या निदर्शनामध्ये आदींची उपस्थिती होती.