आज पासून पेट्रोलपंप 4 वाजेपर्यंतच सुरु; अत्यावश्यक सेवांनाच मिळणार 24 तास सेवा

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. सध्या मराठवाड्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट चा एकही रुग्ण नसला तरीही रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगत मंगळवारपासून पुन्हा अंशता लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामध्ये आता पेट्रोल पंपावरही निर्बंध घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.

बुधवार पासून जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहणांनाच पेट्रोल डिझेल दिले जाणार आहे. यासाठी फक्त 12 पंपानाच परवानगी देण्यात आली आहे. सरकार ने दिलेल्या आदेशानुसार मंगळवारपासून औरंगाबाद येथे अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सायंकाळी 4 वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्यात आले होते. यामध्ये बुधवारपासून पेटोल पंपांचाही समावेश करण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीण भागातील सर्व पेट्रोल पंपांना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील वाहनासांठी 24 तास इंधन सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शहर आणि शहरालगत असलेले 12 पंप 24 तास सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामध्ये जळगाव टी पॉइंट जवळील पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन जवळील उबाळे पेट्रोलपंप, उस्मानपुऱ्यातील यूनिक ऐंटो पेट्रोलपंप, टि.व्हि सेंटर येथील पोलिस आर. ओ. पेट्रोलपंप, चिकलठाण्यातील पोलिस आर. ओ. पेट्रोलपंप, जालना रोडवरील राज पेट्रोलपंप, एपिआय येथील भवानी पेट्रोलपंप, सिडको बसस्थानक येथील सरदारसिंग सन्स पेट्रोलपंप, कांचनवाडीतील जय बालाजी पेट्रोलपंप, नारेगाव येथील श्रीकंठ पेट्रोलपंप, मध्यवर्ती जकात नाका येथील मनपा पेट्रोलपंप आणि वाळूज एम्आयडीसीतील हायवेवरील पेट्रोलपंपाचा समावेश आहे.