औरंगाबाद – शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत निघणार आक्रोश मोर्चा. महागाईविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर या आक्रोश मोर्चाविरोधात मनसेकडून “दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण” अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. औरंगाबादेत महापालिका वसूल करत असलेल्या पाणीपट्टीबद्दल यावर मजकूर लिहिण्यात आला आहे. आज शिवसेनेकडून महागाईविरोधात इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
नियमांना शिवसेना नेत्यांकडून हरताळ –
सरकारच्या नियमांना शिवसेना नेत्यांकडून हरताळ फासला गेल्याचं या मोर्चात पाहायला मिळालं. कोविड निकषांप्रमाणे मोर्चाला परवानगी नाही. तरीही मोर्चात सरकारचे मंत्री आमदार आणि खासदार आणि सहभागी झाले. मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्यानं आयोजकांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले. तसेच मोर्चासाठी परवानगी नसेल तर एवढा फौजफाटा का तैनात करण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणं आवश्यक असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे शिवसेना मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई होणार का, याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
इम्तियाज जलील म्हणाले –
या मोर्चाबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा आक्रोश महामोर्चा म्हणजे नाटक. मोर्चाने भाव कमी होत असतील आणि तुम्हाला लोक हवे असतील तर भगवे झेंडे घेऊन आमचे लोक मोर्चात उतरायला तयार आहेत. लोक प्रश्न विचारतील म्हणून अशा प्रकारचा नाटक केलं जातं. आधी लाईटचे भाव कमी करा,टॅक्सेस कमी करा, पेट्रोलमधील तुमचे टॅक्स कमी करा आणि नंतर मोर्चे काढा. लोक येत नाहीत मोर्चाला म्हणून मुंबईतून नेते बोलवले आहेत, असं जलील म्हणाले.