झाकीर पठाण यांच्याकडून कराड शहरात असंघटीत महिला कामगार व वयस्कर महिलांना रोज 75 जेवणाचे डबे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात असंघटीत महिला कामगार व वयस्कर महिलांना रोज 75 जेवणाचे डबे सातारा जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण यांच्याकडून दिले जातात. त्यांच्या सामाजिक कामाचे गोर- गरिब लोकांच्याकडून काैतुक केले जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ. नाना पटोले व अल्पसख्यांक विभागाचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. एम. एम. शेख यांच्या आदेशावरुन कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. कराड शहरात असंघटीत महिला कामगार व वयस्कर महिलांना जेवण बनवून देण्याचे काम टीप टॉप सर्व्हिसेस (शिव भोजन) कडून जेवण शिजवून दिले जाते. या वेळी झाकीर पठाण यांच्या समवेत कराड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय मुठेकर उपस्थित होते.

यावेळी झाकीर पठाण म्हणाले, कराड शहरात कडक लाॅकडाऊनच्या काळात रोजंदारीवरील कामे बंद आहेत. त्यामुळे असंघटीत असणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या लोकांना किराणा दुकाने बंद आहेत, कामधंदा बंद यामुळे आम्ही एक सामाजिक भावनेतून मदत करत आहोत.

Leave a Comment