मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही- गोपीचंद पडळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात असतानाच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही असे पडळकर म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. हे सर्व शरद पवारांच्या नेतृत्वात सुरु आहे. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही.’ असा घणाघात पडळकरांनी केलाय.

मराठा, ओबीसी आणि पदोन्नती या सर्व आरक्षणाला पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे, असं सांगतानाच ओबीसी आरक्षण रद्द होण्यास हे सरकारच जबाबदार आहे. या सरकारने अजूनही मागासवर्गीय आयोग गठीत केला नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment