वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये जालीम उपाय म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊन पाळावा म्हणून सरकार वारंवार लोकांना आवाहन करत आहे. मात्र, काही लोक या काळातही विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अखेर अशांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी त्यांना लाठ्यांचा प्रसाद सुद्धा दिला आहे. मात्र, जर पोलिसांच्या अशा धडक कारवाईमध्ये मार पडलेल्या महाभागांना पोलिसांची ही कृती जर क्रूर वाटतं असेल तर जरा थांबा! जगभरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना काय शिक्षा दिली जाते हे जाणून घेतल्यास तुम्हीही म्हणालं गड्या घरात बसू आणि लॉकडाऊन पाळू. तर जाणून घ्याजगातील विविध देशात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना काय शिक्षा दिली जाते ते..
१) फिलिपाईन्स- या देशाचे राष्ट्रपती दुतेर्ते यांनी क्वारंटाईन नियम मोडणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं काही झालं तरी आता या देशातील लोकांना एक पाऊल सुद्धा घराबाहेर टाकता येत नाही आहे.
२) इटली- कोरोनाने सर्वात जास्त हैदोस यूरोपातील कुठल्या देशात घातला असेल तर तो देश आहे इटली. कोरोनाने इटलीतील हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळं इटलीत लॉकडाऊनचे नियम अतिशय कड़क केले आहेत. इटलीत विनाकारण घराच्या बाहेर पडल्या या देशात अडीच लाख दंड आणि लोमार्डी येथे 4 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. आतापर्यंत 40 हजारांपेक्षा अधिक जणांना दंड ठोठवण्यात आला आहे.
३) रशिया- रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी आपल्या देशात कोरोना फैलावू नये म्हणून कठोर निर्बंध लागू केले आहेत. रशियातील जे नागरिक क्वारंटाईनमध्ये त्यांनी क्वारंटाईन मोडल्यास 7 वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावण्यात येत आहे.
४) सौदी अरेबिया – लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरताना आढळल्यास 1 कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. आरोग्य आणि प्रवाशाची माहिती लपवल्यास जवळपास 93 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे.
५) मॅक्सिको- मॅक्सिको या देशामध्ये एखाद्याने जर कोरोनाची लागण झाल्याची बाब लपवली तर त्या वयक्तिक 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.
६) ऑस्ट्रिया-चेक प्रजासत्ताक- येथे बाहेर पडण्यासाठी मास्क घालणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या दंड चुकवावा लागतो.
७)पनामा- या देशात बाहेर पडण्यासाठी पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे देश निश्चित करण्यात आलेले आहेत. महिला सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 2 तासांसाठी बाहेर निघू शकतात.
८) कोलंबिया- या देशात आयडी नंबरच्या आधारावर बाहेर जाण्याची परवानगी आहे. ज्यांचा आयडी क्रमांक 0, 4, 7 आहे ते केवळ सोमवारी बाहेर निघू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”