हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांत देशभरात हाहाकार उडवून देणारा कोरोना वायरसचे प्रमाण सध्या कमी आलं आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात सूचवलं आहे.
दरम्यान, कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. ”विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.”, असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे, भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) December 21, 2020
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते. इतक्या रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’