हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग चांगलाच वाढला आहे. यात महाराष्ट्रात येत्या 7 मे तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज पुण्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी तब्बल पाच वर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर उभे राहिले आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उभे केले आहे. त्यामुळे पुणे मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप ही लढत चांगलीच घासून होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी पुण्यात सभांचा धडाका लावला आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा पार पडणार आहे.
सभेची वेळ आणि ठिकाण
यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमुळे राहुल गांधी यांनी पुण्यातील युवकाची संवाद साधला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी राहुल गांधी यांची पुण्यात सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसकडून पुण्यात जल्लत तयारी ही करण्यात आली आहे. दरम्यान, आज ठीक दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील एसएसपीएमएस’ संस्थेच्या मैदानात त्यांची सभा पार पडेल. या सभेसाठी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील.