हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिली आहे. दि. 4 सप्टेंबर रोजी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने परिपत्रक जारी करून दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रखडली होती. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षांची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती. अखेर विद्यार्थ्यांची परीक्षेची प्रतीक्षा थांबली आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
#mpsc
धन्यवाद @CMOMaharashtra pic.twitter.com/qWItPpduIc— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) August 4, 2021
आयोगाच्या वतीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी विद्यार्थ्यांनी आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहनही आयोगाच्यावतीने करण्यात आलेले आहे.