श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी रथाचे राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते पूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. रथोत्सवाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेवागिरी महाराजांच्या सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सेवागिरी महाराजांच्या यात्रेस मोठी गर्दी झाली. या सोहळ्यास लोकप्रतिनिधीसह मंत्रीही उपस्थित राहिले आहेत.

याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री संदिपान भूमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची माहिती घेतली. याप्रसंगी श्री. विखे पाटील व श्री. भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.