परभणी जिल्ह्यात रविवारी 2 लाख 11 हजार बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी रविवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाला पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

जिल्हात रविवारी आयोजीत या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील 2 लाख 11 हजार 432 बालकांना लस देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात एकुण 1 हजार 553 बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच 128 मोबाईल टीम आणि 393 ट्राझिंट टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 4 हजार 093 मनुष्यबळ मोहिमेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकही बालक पोलिओ लसीकरणांपासुन वंचित राहू नये यासाठी 27 फेब्रुवारी रोजी आयोजित पल्स पोलिओ मोहिमेतून वंचित राहिलेल्या बालकांना लस देण्यासाठी ग्रामीण भागात 1 ते 8 मार्च तर शहरी भागात 1 ते 5 मार्च या कालावधीत पुन्हा मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या बालकांचे पल्स पोलिओची लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

Leave a Comment