Pune Accident| पुणे जिल्ह्यात आज सलग दोन भीषण अपघात घडले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) नारायणगाव येथे आणि आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या दुर्घटनांमध्ये (Fatal Accident) एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे . तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघात कुठे आणि केव्हा घडले.. (Pune Accident)
आज पहिली दुर्घटना पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे घडली. या महामार्गावर आयशर टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मॅक्झिमो गाडीला धडक दिली. त्यामुळे ही गाडी थेट एस.टी. बसवर आदळली. या विचित्र अपघातात (Pune Accident) मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर होऊन सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जखमी झालेल्या व्यक्तींवर नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
आज दुसरी घटना ही आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटा येथे घडली. उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ता क्रॉस करत असलेल्या दुचाकीला एस.टी. बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रमेश मेमाणे (60), संतोष मेमाणे (40), आणि पांडुरंग मेमाणे (65) यांचा समावेश आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.