Pune Ahilyanagar New Railway Route : पुणे- अहिल्यानगरसाठी नवा रेल्वेमार्ग!! या 11 स्थानकांवर थांबणार

Pune Ahilyanagar New Railway Route
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Ahilyanagar New Railway Route । पुणे ते अहिल्यानगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते अहिल्यानगर दरम्यान आता नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. हा रेल्वेमार्ग सध्याच्या सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा ३८ किलोमीटर कमी असेल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. महत्त्वाची बाब अशी की हा नवा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूलाच विकसित केला जाणार आहे. पुणे ते अहमदनगर या दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यांना या नव्या रेल्वेचा नक्कीच फायदा होईल.

अहिल्यानगर ते पुणे या थेट रेल्वेमार्गाची (Pune Ahilyanagar New Railway Route) गेल्या अनेकवर्षांपासून मागणी होती. स्थानिक खासदारांसह नगरकरांनी या मार्गासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केलेला आहे. रेल्वेमार्ग व्हावा म्हणून नगरकरांची मोठी स्वप्नं होती. खासदार निलेश लंकेंडकडूनही संसदेत यांनीही संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता. आता या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी हालचाल बघायला मिळतेय. या रेल्वे मार्गासंदर्भात डीपीआर रेल्वेबोर्डाला सादर करण्यात येत आला आहे. सध्या पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास जर रस्त्याने केला तर प्रवाशांना तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो. मात्र नव्या रेल्वे मार्गामुळे दीड ते पावणे दोन तासात पुण्याहून नगर गाठता येणार आहे.

कसा असेल मार्ग? Pune Ahilyanagar New Railway Route

सध्याचे पुणे – अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे अंतर 154 किलोमीटर इतके आहे, मात्र प्रास्तवित नवीन रेल्वेमार्ग (Pune Ahilyanagar New Railway Route) अवघ्या ११६ किलोमीटरचा आहे. सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे. आता हेच अंतर ११६ किलोमीटरवर येणार आहे, म्हणजेच ३८ किमी अंतर कमी होईल. मध्य रेल्वे कडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पुणे ते अहिल्यानगर या दोन शहरा दरम्यान तयार होणाऱ्या नव्या रेल्वे मार्गावर अकरा स्थानके विकसित होणार आहेत. यामध्ये पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या स्थानकांचा समावेश आहे. पुण्यावरून शिक्रापूर, वाघोलीला कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यांना या नव्या रेल्वेचा फायदा होईल. या महत्वाच्या रेल्वे प्रकल्पसाठी सरकार ११ हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे.