पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडनजीक गोडाऊनला भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे बंगळुरू महामार्गावर कराड नजीक गोटे हद्दीत जुने टायर स्क्रॅप गोडाऊन ला भीषण आग लागली आहे. रात्री 11 च्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने दाखल झाल्या. अखेर 2 तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, , कराडजवळ गोटे गावच्या हद्दीत हॉटेल फर्न पासून काही अंतरावर अचानक आग लागली. आगीचे मोठ मोठाले लोट पसरल्याने महामार्गावर वाहतूक काही काळ खोळंबली होती. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या आगीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्यांना फोन केला. यावेळी कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपालिकेच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर कराड शहर पोलीस कर्मचारीही दाखल झाले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीच्या घटनेमुळे गोटे व मुंढे गावचा विद्युत पुरवठा खंडित होता. तसेच महामार्गावरील वाहतूक सुद्धा खोळंबली होती