हिट अँड रन ! पुण्यात रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला व्यावसायिकानं चिरडलं, CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक भयंकर अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पुण्यात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडण्यात आले आहे. पुण्यातील सॅलिसबरी पार्कमध्ये हि दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अनूप मेहता या व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1519535139969150976

काय आहे या व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि एक व्यक्ती फुटपाथच्या बाजूला झोपली होती. यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने अनूप मेहता या व्यावसायिकाने त्याच्यावर अंगावर गाडी घातली. या प्रकरणी आरोपी व्यावसायिक अनूप मेहता याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये दिसत आहे कि हि घटना किती भयंकर आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अंगावरून गाडी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू
या दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगावरून गाडी गेली त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती रस्त्याच्या कडेला झोपलेली होती. तर व्यावसायिक अनूप मेहता हे चारचाकी गाडी चालवत होते. यावेळी त्यांना समोर व्यक्ती झोपलेली आहे, हे दिसले नाही. यानंतर त्यांनी चक्क रस्त्यावर झोपलेल्या माणसाच्या अंगावर गाडी घातली. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी व्यावसायिक अनूप मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.