पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेसाठीचा निकाल आज जाहीर होणार असून पुणे जिल्ह्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू असताना काँगेस पक्षाने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणी सुरू असताना काही ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या नसल्याचा आक्षेप काँगेस कडून घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरू असलेली मतमोजणी तहकूब करण्यात आली आहे. काँग्रेसने आक्षेप घेऊन ही मत मोजणी तहकूब केल्यानंतर वरीष्ठ निवडून अधिकारी या मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले आहेत.
या मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार दिलीप कांबळे हे 300 मतांनी आघाडीवर आहेत.तर काँग्रेसचे रमेश बागवे हे पिछाडीवर आहेत. 2014 च्या निवडणुकीत कांबळे यांनी बागवेयांचा पराभव करत विजय मिळवला होता. यावर्षी देखील कांबळे यांनी आघाडी घेतल्याने नेमकं काय निकाल समोर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु सध्या काँग्रेसने आक्षेप घेत मतमोजणी थांबवल्याने नेमकं काय होत हे पाहावे लागणार आहे.